ताज्या घडामोडी
परळी जवळ मालवाहू रेल्वेच्या धडकेत एक मेंढपाळा सह 22 मेंढ्या ठार
रेल्वेच्या धडकेत 22 मेंढ्या, 2 गाई सह गुराखी ठार.

आनंद वीर(प्रतिनिधी) परळी शहरापासून जवळ असलेल्या मलकापूर शिवारात आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मालवाहू रेल्वेच्या खाली आल्याने 22 मेंढ्या, 2 गाई सह मेंढपाळ जागीच ठार झाला.परळी शहरातील धनगर गल्लीतील मुंजा डोणे रा.उखळी हल्ली मुक्काम परळी हे दोघे मेंढपाळ, मेंढ्यांना चरण्यासाठी परळी शहरा जवळील डोंगराळ भागात गेले असता परळी हैदराबाद रेल्वे रुळावर आलेल्या मालगाडीने मेंढ्या,गाई सह गुराख्यांना ऊडवल्याने मेंढ्या साहेब गुराखी जागीच ठार झाले.दोन्ही बाजूने डोंगर असल्याने वेळीच उपचार न मिळाल्याने मेंढपाळ मुंजा डोने हे जागीच ठार झाले असून मधुकर सरोदे हे गंभीर जखमी झाले असून त्यावर उपचार सुरू आहेत.