दिवसा ढवळ्या महिलेचे सोन चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडले
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना,नागरिकात भीतीचे वातावरण

आनंद वीर(प्रतिनिधी)शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत मागील काही दिवसात चोऱ्या,मारामारी, छेडछाडी च्या घटनेत वाढ झाल्याची दिसून येत आहे. गुन्हेगारावर, चोरट्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमुखाचा वचक राहिला नसल्याने अशा घटना दिवस वाढ होत आहे. बीड शहरातील भाग्यनगर भागातील मंगलबाई चंद्रकांत गिराम ह्या दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास चाणक्यपुरी परिसरातून एकट्याच घराकडे पायी जात असताना दोन चोरट्याने महिला जात असलेल्या रस्त्यावर एक कागदाची पांढरी पुढी टाकत महिलेला तुमच्या जवळील वस्तू खाली पडली आहे असे सांगितल्याने मंगलबाई गिराम यांनी ती वस्तू उघडून पाहिल्यास त्यामध्ये सोन्याच्या बिस्कीट सारखे सारखे होते. त्या दोघांनी सांगितले की हे तुमचे सोन्याचे बिस्किट आहेत असे सांगून, गोंधळात टाकल्याने काही समजण्याच्या आतच मंगलबाई गिराम यांच्या हातात च्या बोटातील अंगठी व गळ्यातील मंगळसूत्र काढून ते चोरटे पळून जात होते, तेवढ्यात आपल्याला फसवून आपलाच सोन ते घेऊन जात आहेत असे लक्षात येतात आरडाओरड केल्याने,जवळून जात असलेल्या तरुणांनी त्यां चोरट्यांना पाठलाग करून पकडून त्यांच्याकडून सोन्याची अंगठी व मंगळसूत्र परत घेतले.विकास विजय जाधव रा.धस पिंपळगाव ता.पाटोदा, अभिमान बाबू तुपे रा.उखंडा ता.पाटोदा या दोघांना पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.या दोघांवर यापूर्वीही गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळत असून दिवसा ढवळ्या लुटल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.