गेवराई तालुक्यात ड्रोन ऑपरेट करणाऱ्यास नागरिकांनी पकडून मारहाण करत दिले पोलिसाच्या ताब्यात.
रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते

आनंद बीड(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यामध्ये मागील काही दिवसात धोंडराई परिसरातील वाड्या,वस्त्या परिसरात रात्रीचे वेळी तीन ते चार ड्रोन घिरड्या घालत अचानक हे ड्रोन गायब होत होते त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते.धोंडराई , चकलंबा परिसरामध्ये गेल्याच आठवड्यात चोरांनी धुमाकूळ घातल सोन लुटून नागरिकांना मारहाण केली होती,त्यामुळे हे ड्रोन लोकेशनसाठी तर नाहीत ना?, हे ड्रोन कोण व कशासाठी रात्री उडवत आहे?, हे ड्रोन उडवण्यामागील हेतू काय?हे ड्रोन चोर तर उडवत नसतील ना? असे अनेक प्रश्न लोकाला पडले होते.चोरांच्या भीतीमुळे नागरिकांनी आपल्या गावात वस्त्यावर रात्रीचे जागरण सुरू केले होते. दोन दिवसापूर्वी ड्रोन दिसल्याने नागरिकांनी आपल्या परिसरातील माहिती घेतली असता दोन व्यक्ती ड्रोन ऑपरेट करत असल्याचे दिसल्याने नागरिकांनी त्यांना पकडून मारहाण करत गेवराई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिले. ड्रोन विषयी माहिती, तक्रार गेवराई पोलीस ठाण्यात केली असता. हे ड्रोन लष्करासाठी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीकडून चाचण्या सुरू असल्याची माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रवीण कुमार बांगर यांनी दिली असून नागरिकांनी घाबरून न जाता अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले.