
वीर (प्रतिनिधी) केज तालुक्यातील लव्हरी या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जिवाचीवाडी केंद्रतर्गत हनुमान वस्ती शाळेची दुरावस्था झाली असून शाळेतील वर्ग खोल्याचे पत्रे गंजले असल्याने पावसाळ्यात बदाबदा गळते, तसेच वर्ग खोल्यातील फरश्याची दुरस्त झाली असल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, अन्य निवारा नसल्याने विद्यार्थ्यांना जास्त पाऊस झाल्यास सुट्टी द्यावी लागते. अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक गोकुळ सारूक यांनी दिली.या वस्ती शाळेच्या आजूबाजूचे लोक ऊसतोड मजूर असून याची लोकसंख्या जवळपास 400 च्या वर आहे. या शाळेतील पटसंख्या 40 विद्यार्थ्यांची होती परंतु, वर्ग खोल्या व वस्ती शाळेची दुर्वास्था पाहून पालकांनी विद्यार्थ्यांना इतरत्र टाकल्याने 11 वर आली आहे.विद्यमान खासदार खासदार व शिक्षण सभापती बजरंग बप्पा सोनवणे 2021 मध्ये या वस्ती शाळेला भेट देऊन इमारतीची दुरवस्था पाहून इमारतीचे बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती मधून आठ लाख लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करत भूमिपूजन केल्याने त्यांचा शाळेत सत्कार देखील करण्यात आला होता परंतु अद्यापही या इमारतीचे बांधकाम सुरू झाले नसल्याने हा निधी कुठे गेला? हे सुद्धा गोडबंगाल आहे. त्यामुळे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी इमारतीची दुरावस्था पहाता शाळेच्या इमारतीसाठी निधी द्याव अशी मागणी विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थातून होत आहे.