राजस्थानी विद्यालयाच्या सायकल रॅली ने”तिरंगा जनजागृती”चे भूषण वाढवले
"हर घर तिरंगा घर घर तिरंगा"
बीड. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातर्गत भारत देशात हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे.शहरातील मदनलालजी सारडा राजस्थानी प्राथमिक विद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन शैक्षणिक,सामाजिक स्तरावर आपले महत्त्व अधिरेखित करणात विद्यार्थी व शिक्षक वर्ग नेहमीच अग्रेसर असतात.या शाळेतील छोट्या चिमुकल्यानी इयत्ता चौथी वर्गाच्या 150 भव्य सायकल रॅली काढून भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषाने पेड बीड भाग दणाणून गेला.या शाळेतील पदाधिकारी व आजच्या ध्वजारोहणाचे प्रमुख पाहुणे सौ.माधवी प्रदीप चिकलांगे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात करण्यात आली.रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आली असता संस्थेचे सचिव रामेश्वर जी कासट, सहसचिव किशोर जी बाहेती, कोषाध्यक्ष गंगाभिषणजी करवा, संचालक जगदीश जी चरखा, केदारजी जाजू,बालाप्रसाद जाजू यांनी महामानवाला पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.कसबे, मुख्याध्यापक लाहोटी, संहयोग नगर शाळेचे मुख्याध्यापक श्री पारीख, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गिरीश सोहनी सर उपस्थित होते.हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री, लड्डा,श्री मंत्री व सह शिक्षक शिक्षिका व कर्मचारी परिश्रम घेतले यांनी