
आनंद वीर(प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची येत्या बीड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बदली झाल्याने बीड नूतन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाचा दोन दिवसापूर्वी पदभार घेतल्यावर जिल्ह्यातील सर्वच ठाणे प्रमुखांना गुन्हेगारावर कारवाई करण्याचे आदेश दिले.तसेच बीड जिल्ह्यातील अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.त्या अनुषंगाने माननीय स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बीड गावठी पिस्टल बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांनच्या पथकास सूचना दिल्याने गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली की,307 गुन्ह्यातील फरार आरोपी अभिषेक डोंगरे हा तेलगाव नाका परिसरात उभा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर मा. पोलीस निरीक्षक शेख यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक खटावकर व कर्मचारी यांनी तात्काळ तेलगाव नाका येथे जाऊन बीड बीड पोलीस ठाणे हद्दीतील 307 सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी अभिषेक डोंगरे वय 23 वर्षे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडे दोन पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.यांची किंमत 82000/रुपयेचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावरती पोलीस स्टेशन पेठ बीड 215/2024,कलम 3/25भाहका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर,पो.हे.मनोज वाघ,पो.अशोक दुबाले,पो.ना.विकास वाघमारे,पो.ना. सोमनाथ गायकवाड,पो.कॉ.अश्विन कुमार सुरवसे, पो.कॉ.सचिन आंधळे, पो.कॉ.सुनील राठोड, पो.कॉ.नारायण कोरडे सह सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली.