सुरेश कुटेनी ठेवीदारांचा,बोगस कंपन्याचा पैसा हाँगकाँग मध्ये !
अर्चना कुटे सह संचालक मंडळ फरार कसे..?

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन, अध्यक्ष सुरेश कुटे यांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याने महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरेश कुटे,अर्चना कुटे सह संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात फसवण्याची गुन्हे दाखल असल्याने सुरेश कुटे,आशिष पाटोदकर हे पोलिसाच्या ताब्यात असून,दोन दिवसापूरवीच बीड शहरातील कुटे चे कपड्याचे दुकान,मुख्य कार्यालय तसेच औरंगाबाद येथील कार्यालयावर ईडी ने छापेमारी केल्याने तपासात धक्कादाय माहिती समोरील असून कुटे नी ठेवीदाराचा पैसा बोगस कंपन्यां मार्फत हाँगकाँग ला नेल्याची समोर आली आहे. महाराष्ट्रात ज्ञानराजाच्या 52 शाखा असून बीड जिल्ह्यामध्ये 22 शाखा आहेत.यातील ठेवीदाराचे तीन हजार सातशे कोटीच्यावर पैसे अडकले असल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत.ईडी व पोलिसांनी कारवाई करत कुटे,पटोदकर च्या पाच हजार कोटी ची मालमत्ता जप्त करण्यात आली असून आणखी राज्यात व राज्याबाहेर असलेल्या मालमत्तेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ईडीचे तपासात महितीं समोर आली की, मुख्य संचालक यशवंत कुलकर्णी यांनी विविध सेल, संस्थेमार्फत लिरिंग द्वारे काढून टाकला तसेच भागभांडवल,गुंतवणूक म्हणून स्वतच्या कुटे ग्रुप मध्ये सादर केला. त्यानंतर बोगस सेल, संस्था तयार करून हे पैसे हाँगकाँग ला पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत असल्याने हा खूप मोठा स्कॅम,फसवणूक असल्याची माहिती समोर येत असून अर्चना कुटे व कुलकर्णी सह संचालक मंडळ फरार असल्याने तपासात गती मिळत नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे पोलिसांनी फरार असलेले यशवंत कुलकर्णी यांना अटक केल्यावरच ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग सुकर,मोकळा होईल असे ठेविदर मागणी करत आहेत.