पालकमंत्री धनंजय मुंडे यांना माजी सैनिकांनी दाखवला काळा झेंडा.
बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसलेल्याची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन निवेदन स्वीकारले.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्या साठी उपोषणास बसलेल्यांची भेट घेत असताना माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी बीड तालुक्यातील शिवनी शिवारातील जमिनी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून देखील अन्याय होत असल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना काळा झेंडा दाखवून निषेध नोंदवला. माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांची बीड तालुक्यातील शिवनी येथे शेत गट नंबर 622 शेतातील निवाऱ्यासाठी केलेल्या शेड ची नासधूस करत,आतील शेती अवजारांची मोडतोड केली,शेड गॅस कटरने तोडले याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता,सर्व काही पुरावे असताना देखील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करून घेतला नसल्याने बीड पोलीस अधीक्षक यांना भेटून नासधूस,मोडतोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती परंतु त्यांनी देखील दखल न घेतल्याने, कायद्याच्या भंग केल्याने दोघांवरही एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालसमोर उपोषणास बसले होते,पालकमंत्री धनंजय मुंडे हे उपोषणास बसलेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी गेले असता माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी काळा झेंडा दाखवून निषेध केला. तात्काळ सुरक्षारक्षकांनी काळा झेंडा ताब्यात घेतला. त्यामुळे या उपोषणकर्त्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर होत आहे.