ताज्या घडामोडी
सिरसदेवी परिसरात चोरांचा धुमाकूळ
चोरांनी अडागळे वस्तीवर दगडफेक केल्याने नागरिकात भितीचे वातावरण

आनंद वीर(प्रतिनीधी)गेवराई तालुक्यातील सिरसदेवी फाट्याजवळ असलेल्या अडागळे वस्तीवर रात्री आठ ते 11 च्या दरम्यान चोरटे दगडफेक करत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.दिनांक 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुन्हा चोरट्यांनी वस्तीवरील काही ठराविक घरावर दगडफेक करत पळ काढला,काही नागरिकांनी दगडफेक करणाऱ्याला पकडण्यासाठी पाठलाग केला असता चोरटे अंधारात पसर झाले.यामुळे नागरिक,महीला, मुले भयभीत झाल्याने तलवाडा पोलिसांना याची माहिती दिली असता पोलीस कर्मचारी तत्काळ वस्तीवर दाखल झाले व या घटनेविषयी सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना केले,काही अडचण असल्यास पोलीस ठाण्याला संपर्क करून माहिती द्यावी असे सांगण्यात आले.पोलीसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी केली.