पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वस्तीशाळा इमारतीसाठी दिला निधी.
सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर"उघड्यावर शाळा"आंदोलनाची घेतली दखल

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 98 शाळा विरहित असून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी पायाभूत सुविधाचा अभाव असून गेल्या दहा वर्षापासून उघड्यावर,झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, समाज मंदिरात व किरायाच्या जागेमध्ये वस्ती शाळा भरवावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ऊन, वारा,पाऊस सह नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत होता. बीड जिल्ह्यातील वस्ती शाळांना इमारतीसाठी निधी मंजूर व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक वस्ती शाळा भरूउन,आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, या आंदोलनाची दखल घेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 25 वस्ती शाळा इमारतीसाठी प्रत्येकी दहा लक्ष रुपये देण्यात आला. यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संगीता देवी पाटील, शिक्षण अधिकारी प्राथमिक भगवान फुलारी यांचे विद्यार्थी शिक्षक व पालक वर्ग यांनी आभार व्यक्त केले.