ताज्या घडामोडी
शिवस्वराज्य यात्रेत तेलगाव मध्ये राडा,अमोल कोल्हे यांचे भाषण बंद पाडले.
अमोल कोल्हे व खासदार बजरंग सोनवणे समोर मराठा कार्यकर्त्याची जोरदार घोषणाबाजी

आनंद वीर(प्रतिनीधी)बीड जिल्ह्यात शिव स्वराज्य यात्रा आली असता आज दुपारच्यावेळी तेलगाव मध्ये आमदार अमोल कोल्हे यांचे भाषण सुरू असताना कार्यक्रमा मध्ये मराठा कार्यकर्ते आले व मराठा आरक्षणा विषयी तुमची व राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका आहे हे विचारत “एक मराठा लाख मराठा”अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ कार्यक्रम स्थळी गोंधळ उडाला होता,खासदार बजरंग सोनवणे यांनी मध्यस्थी करत मराठा कार्यर्कत्यांना सांगितले की मराठा समजला आरक्षण मिळावी हीच आमची भूमिका आहे,आम्ही आपल्या सोबत आहोत,त्यामुळे तुम्ही अमोल कोल्हे यांचे भाषण होवू द्या अशी विनवणी केली.अमोल कोल्हे यांनच्या गाडीला मराठा कार्यर्कत्यांनी घेराव घातला.