ताज्या घडामोडी
गेवराई बायपास रोडवर भीषण अपघात.
भरधाव चारचाकीने विरुद्ध दिशेने कंटेनर ला दिली जबर धडक

आनंद वीर(प्रतिनिधी)धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपास रस्त्यावर दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास चारचाकी बुलोरो MH 24 BR 8785 भरधाव वेगाने बीड कडे येत असताना गेवराई बायपास रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने एका संभाजीनगर कडे जाणाऱ्या कंटेनर वर जावून धडकल्याने वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झालं असून या वाहनात तीन प्रवाशी असल्याची माहिती मिळत असून दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखण्यात नेण्यात आले. अपघातातील जखमींची नावे समजली नसून घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाती वाहन क्रेन च्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.