बीड न.प.च्या पावत्या देऊन भाजी विक्रत्याकडून सक्तीची वसुली
दिवसातून दोन वेळा पावत्या,नागरिकांची तक्रार

आनंद वीर(प्रतिनीधी)बीड नगर पालिका सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते.बीड शहरात जवळपासच्या खेडेगावातून शेतकरी भाजीपाला,फळ विकण्यासाठी बीड शहरातील पालवन चौक, राजीव गांधी चौक,बाजार, मोमीनपुरा,शिवाजी नगर सह शहरातील विविध भागांमध्ये भाजीपाला विकण्यासाठी बसतात.नगर पलिकेच्या पावत्या घेऊन काही लोक या शेतकऱ्याकडून दहा रुपये देऊन पावती देऊ लागले आहेत, काही ठिकाणातील दिवसातून दोन वेळा पावती दिल्याची शेतकरी तक्रार करत आहेत.त्यामुळे ह्या पावत्या खऱ्या की बोगस आहेत?का फक्त नगरपालिकेच्या नावाने वसुली सुरू आहे हे शेतकऱ्यांना समजायला मार्ग नाही.तसेच आठवणी बाजार असल्याने रविवारी खेडेगावातून बाजारतळ काही लोकं सक्तीने वसुली अरेरावी करतात.ते लोक नगरपालिकेला नेमलेले आहेत की खाजगी लोकांनी?बाजार ठिकाणी सकाळी कोबड्या,गावरान अंडे, बकरे विकण्यासाठी बसलेले असतात त्यांना देखील पैश्याची मागणी होत असल्याच्या तक्रारी येत असून,एखादा शेतकरी जर पैसे नंतर देतो म्हणला तर त्याच्याजवळ सामान उचलायची देखील या लोकांची तयारी असते,म्हणून नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून नगरपालिकेच्या पवत्या देणाऱ्याची चौकशी करून, जर या पावत्या बोगस वाटप होत असेल पैशाची वसुली सक्तीने करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकातून होत आहे.