पत्रकार मारहाण प्रकरणी बीड पोलीस अधीक्षकाना निवेदन,चौकशीची करून निलंबनाची मागणी
चकलांबा पोलीस ठाणे उपनिरीक्षक आनंता तांगडे यांनी केली बेदम मारहाण

आनंद वीर(प्रतिनिधी)गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी पत्रकार अस्लम कादरी यांनी वाळू वाहतूक करणारी वाहने पोलिसांनी कारवाई न करताच सोडून दिल्याचे फोटो,व्हिडीओ काढल्याचा राग आल्याने पत्रकाराला चकलांबा पोलीस बोलवून तू आमच्या विरोधात वाळूच्या बातम्या करतो असे म्हणत अंगावर वळ येईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आल्याने पायाला गंभीर दुखापत झाली.पत्रकाराचे भावाला देखील मारहाण करण्यात आलीया. मारहाणीची तक्रार देण्यासाठी चकलंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्याकडे पत्रकार गेले असता एकशिंगे यांनी देखील तक्रार दखल करून न घेता पत्रकाराला हाकलून देत अनंता तांगडे यांची पाठराखण केली.यावर तांगडे यांनी कोणाकडेही जा माझं काहीच होणार नाही असे म्हणत शिवीगाळ केली.अस्लम शेख हे मागील 10 वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करत असून बेदम मारहाण,शिवीगाळ व अपमानामुळे त्यांचे मनोधैर्य खचले आहे.त्यामुळें निर्भीड पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, पत्रकारांनी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आनंदात तांगडे यांची चौकशी करून निलंबित करावे अशी निवेदनातून मागणी केली आहे.