वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराजावर गुन्हा दाखल,करून अटक करा.
दोन धर्मियांमध्ये कलह, द्वेष निर्माण करण्यावर महाराजाला गुन्हा दाखल करावा.

आनंद वीर(प्रतिनिधी) इस्लाम आणि मोहम्मद पैगंबरा बद्द्ल अक्षपार्य विधान केल्याने रामगिरी गुरु नारायण महाराज,सरला बेट ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांच्यावर गुन्हा दखल करून अटक करण्यात यावी यासाठी मुस्लिम धर्माच्या शिष्टमंडळांनी दिनांक 17ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेऊन दोन धर्मीयांमध्ये जाणून पूर्वक तेढ निर्माण धार्मिक द्वेष,कलह निर्माण करण्याचा महाराजांवर कारवाईची मागणी केली. मोहम्मद पैगंबर हे अरबी नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होते पारंपारिक इस्लामाच्या धोरणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते. महंमद पैगंबर यांनी कुराण व धर्मग्रंथ लोकापर्यंत पोहोचवल्याने त्यांना नबी,रसुल नावाने संबोधित केले जाते.विधानसभा निवडणुकीपूर्वी जाणीवपूर्वक अशी वक्तव्य करून दोन धर्मामध्ये दंगल घडवण्याची असल्याने अशी वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम शिष्टमंडळांनी केला.एका सप्ताहाच्या प्रवाचनामध्ये मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने रामगिरी गुरु नारायण महाराजावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी असे मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.