बीड शहरातील महिलेची आत्महत्या का खून ?
गुन्हा दखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नातेवाईक ठान मांडून..

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील नगर रोड लगत असलेल्या कालिका नगर येथील संगीता संजय खरात वय 26 वर्ष या कुटुंबा सोबत राहत होत्या, संगीता खरात यांचे लग्न चार वर्षांपर्वी झाले असून, त्यांचे पती पोलीस मध्ये निवड झाल्याने प्रशिक्षणासाठी मुंबई येथे आहेत.मयत महिलेच्या कुटुंबातील लोकांनी बहीणीला सांगीतले की, आमच्या घरात भांडण झाले आहेत तुम्ही घरी या असा निरोप देताच,तत्काळ बहिणीच्या घरी जावून पाहिलं असता गॅलरीमध्ये संगीताचा मृतदेह आढळल्याने तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केले.संगीताने गळफास घेतला नसून तीचा खून केला,ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप मृत मुलीच्या आई,वडील,भावाने केला आहे.संगीताचा पाच लक्ष रुपयांसाठी सासरकडील लोक छळ करत होते,पैसे न दील दिल्याने तिचा खून करून आत्महत्या बनाव केल्याने सासू,सासरा,दिर,जाऊ यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजीनगर ठाण्यात रात्री दहापर्यंत नातेवाईक व गावकरी बसून होते.