ज्ञानराधाच्या ठेविदाराचा वडवणी मध्ये पहिला बळी
ज्ञानराधाचे ठेवीदार अडचणीत,अर्चना कुटे सहसंचालक मंडळ फरार,आणखी ठेवीदाराचे जीव जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 52 शाखा असून, त्या सध्या बंद असल्याने ठेवीदाराना आनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.ठेवीदारानी ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये 3000 कोटीच्या वर पैसे,ठेवी अडकल्या असून शैक्षणिक,लग्न तसेच काही व्यवहार व आजारी असल्यास उपचारासाठी वेळेवर पैसे मिळत नसल्याने काही ठेवीदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट चे चेअरमन अध्यक्ष सुरेश कुटे,अर्चना कुटे सह संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले असल्याने सुरेश कुटे,आशिष पटोदकर हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.वडवणी येथील भगवान दत्तात्रय बारटक्के यांचे वडवणी येथील ज्ञानराधाच्या शाखेत सात लाख रुपये अडकले होते,आपले पैसे मिळणार का नाही या चिंतेत त्यांना हृदय रोगाची लागण झाल्याने त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.अनेक वेळा ज्ञानराधाच्या शाखा व कर्मचाऱ्यांशी संपर्क करून दवाखाना उपचारासाठी पैसे देण्याची मागणी करून देखील वेळेवर उपचारासाठी पैसे न मिळाल्याने भगवान बारटक्के यांचा बळी गेल्याने नातेवाईक संताप व्यक्त करत आहे. ज्ञानराधा ने पहिला बळी घेतल्याची प्रतिक्रिया नातेवाईकाकडून व्यक्त होत आहे.आणखी किती ठेवीदारांचे जीव,बळी जाण्याचे प्रशासन वाट पाहत आहे. प्रशासनाने आता तरी ठोस पावले उचलून, तात्काळ मालमत्ताचा लिलाव करून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून द्याव्यात अशी मागणी ठेवीदारातून होत आहे.