“पेपरच्या बातम्यात काही तथ्य नसत”.!आमदार प्रकाश सोळुंके
या आधी देखील ऑडिओ क्लिपमुळे प्रकाश सोळुंके चांगलेच अडचणीत आले होते

आनंद वीर(प्रतिनिधी) माजलगावचे सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके यांची गेल्या वर्षी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांना चांगलेच महागात पडले होते.बीड विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यावर येऊन ठेपली असल्याने मतदारसंघात संवाद दौरा सुरू आहे सांस्कृतिक सभागृहात कार्यकर्त्यांनी बाजार तळाचा प्रश्न मार्गी लावला नाही किंवा दाखल देखील घेली नसल्याने आमदारांवर नाराजी व्यक्त केली.त्यावर दादा बैठकीत सर्वांन समोर म्हणाले की पेपर मी पेपर वाचन सोडुन दिलंय,”पेपरच्या बातम्यात काहीच तथ्य नसते”हा व्हिडिओ प्रसार माध्यमात व्हायरल झाल्यानें पत्रकार संताप व्यक्त करत आमदार प्रकाश सोळुंके यांनच्यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांनी पेपर वाल्या वर खापर फोडले.काही दिवसापूर्च्या पत्रकारांनी आमदार सोळुंके यांच्या बातम्या वर बहिष्कार घातला होता आता त्या वक्तव्याचा निषेध करत असून येत्या काळात त्यांना अशी वक्तव्य महागात पडण्याची चिन्ह दिसत आहेत.