रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तरुणांचा बळी
रेल्वेच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना देखील दिशादर्शक फलक नाही.

आनंद वीर(प्रतिनीधी) अहमदनगर बीड परळी रेल्वे चे काम प्रगतीपथावर सुरू असून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी येथे नारळी सप्ताह निमित्त सप्ताहाचे कार्यक्रम असल्याने हजारो भाविक भक्त गोरक्षनाथ टेकडी आता दर्शनासाठी व सप्ताहासाठी येत असतात.वाकनाथपुर येथील शिवराज अशोक खाकरे हा 24 वर्षीय तरुण आपल्या पत्नी सोबत गोरक्षनाथ टेकडीवर सप्ताह असल्याने दर्शनासाठी गेला होता. बीड परळी या मुख्य रस्त्यावरून अहमदनगर परळी या रेल्वे मार्गाच्या कामातील एका पुलाचे बांधकाम सुरू असल्याने 25 ते 30 फूट खड्डा खोदलेला आहे.दिनांक 18 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वर याच पुलावरून अशोक खाकरे पत्नी सोबत जात असताना,खड्ड्याचा अंदाज न आल्याने पत्नी सोबत या खड्ड्यात कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला, पत्नी बाजूला पडल्याने गंभीरित्या जखमी झाली असून, शासकीय रुग्णालयात उच्चार घेत आहे. रेल्वे प्रशासनाने ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे शिवराज खाकरे या तरुणाचा बळी गेला. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करून गुन्हा दखल करावा अशी मागणी शिवराज खाकरे यांच्या नातेवाईकांनी व समस्त वाकनाथपूर गावकऱ्यांनी केली आहे.