मंडळ अधिकारी सचिन सानप एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले
मंडळ अधिकाऱ्यांनी केली होती पाच लाख रुपयांची मागणी

आनंद वीर ( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात लाचखोराच्या प्रमाणात वाढ होत असून, त्यावर कारवाई देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात काही वाहनावर पिंपळनेर पोलीस ठाणे व महसूल यांनी पिंपळगाव शिवारात काही टिप्पर वर कारवाई केली होती, मुरूम उपसा झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यासाठी मंडळअधिकारी सचिन सानप यांनी केला होता, 1000 ब्रास चा दंड शेती मालक, व या वाहन मालकावर टाकणार आहे,तो दंड कमी करण्यासाठी व मुरूम उत्खनन कमी दाखवण्यासाठी,रिकामी पकडलेली वाहने सोडवण्यासाठी मदत करतो असे म्हणून बीड येथील मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी वाहनधारकाकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती त्यावर तडजोडीमध्ये एक लाख रुपये देण्याचे ठरले. वानधारकांना हे मान्य नसल्याने,वाहन धारकाने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे याची तक्रार केली .आज दिनांक 21 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास नगर रोडवर तहसील कार्यालयाच्या समोरील हॉटेलमध्ये बीड येथील लाच लोक प्रतिबंधक कार्यालय चे शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून एक लाखाची लाख स्वीकारताना सचिन सानप यांना रंगेहात पकडले. सचिन सानप यांची कारकीर्द ह वादग्रस्त होती, या आधी देखील बोगस फेरफार केल्याचे प्रकरण झाले होते.या कारवाईने लाचखोरांचे धाबे दणाणले असून, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे अधीक्षक पदी शंकर शिंदे हे रुजू झाल्यापासून लाचखोरवर कारवाईचा फास आवळला आहे.