चकलंबा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या चोरी!
दिवसा चोरी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण,चोरावर पोलिसांचां धाक राहिला नाही

आनंद वीर(प्रतिनीधी) गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून,काही दिवसापूर्वीच रात्री आकाशात ड्रोन कॅमेरे फिरत असल्याने नागरिकांनी संशय व्यक्त करत, ड्रोन ऑपरेट करणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, तसेच जवळपासच्या वस्त्यावर देखील चोराने दगडफेक केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण झाले होते, त्यामुळे नागरिक रात्र रात्र जागून काढत होते. मंगळवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी चकलंबा पोलीस ठाण्याच्या दोनशे फुटावर असलेले पत्रकार सलमान शेख च्या घरातील सदस्य शेतामध्ये गेले होते व सलमान शेख यांची तब्येत बरी नसल्याने ते देखील बाहेर गेले होते,घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने कुलूप तोडून शेख यांनच्या घरावर डल्ला मारून घरातील रोख रक्कम 55 हजार रुपये व दीड तोळे सोने असा जवळपास दोन लाखाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे व चकलंबा पोलीस ठाण्यापासून दोनशे फुटावर चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असेल,चोरांना पोलिसाचा धाक राहिला नाही असे दिसून येत आहे.