
आनंद वीर(प्रतिनिधी) शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गट माजी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे सह इतरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला प्रकरणी कुंडलिक खांडे हे जवळपास दीड महिन्यापासून बीड जिल्हा कारागृहात असून जामीन साठी बीड न्यायालयाकडे अर्ज केला असता बीड न्यायालयाने खांडे यांचा जामीन फेटाळला,त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे जामीन साठी अर्ज केला होता,आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात न्या.शिवकुमार डीगे यांच्यासमोर सुनावणी झाली असता दोन्ही बाजूने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालाचे दाखले दिले गेले. कुंडलिक खांडे यांना जामीन दिला तर मूळ फिर्यादी ज्ञानेश्वर खांडे यांना दबाव टाकण्याची शक्यता आहे.असे प्रकार यापूर्वीही घडले असल्याने खांडे यांना जामीन देऊ नये अशी भूमिका न्यायाधीशासमोर मांडण्यात आली.सर्व युक्तिवाद न्यायालयाने ऐकल्यानंतर या प्रकरणाचा निकाल 28 ऑगस्ट बुधवार रोजी दिला जाणार आहे.त्यामुळे कुंडलिक खांडे यांचा कारागृहातील मुक्काम आठ दिवस वाढल्याचे दिसत आहे.