
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड पिंपळनेर रस्त्यावरील उमरी फाटा या ठिकाणी दिनाक 23 ऑगस्ट रोजी दुपार च्या सुमारास दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एक जागीच ठार झाला.मयत लक्ष्मण मस्के वय 48 वर्षे हे मोटरसायकल वरून जात असताना समोर येणाऱ्या अज्ञात भरधाव मोटरसायकलने मस्के यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने मस्के हे रस्त्यावर पडून गंभीर दुखापत झाली, अपघात झाल्यानंतर मस्के यांना धडक देणारा दुचाकीस्वार अपघात स्थळावरून पळून गेला. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी जखमी मस्के यांना दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता,रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.पिंपळनेर पोलीस धडक दिलेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.