ताज्या घडामोडी
बीड परळी रस्त्यावरील पर्यायी पुल वाहून गेल्याने वाहतूक रस्ता बंद
रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पुल करण्यात आला होता,तो देखील गेला वाहून

आनंद वीर(प्रतिनिधी)अहमद नगर बीड परळी सिमेंट रस्ता काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी पुल करण्यात आले आहेत.बऱ्याच दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.काल दिनाक 23 ऑगस्ट रोजी दुपारपासूनच पावसाची सुरुवात झाली होती, परळी तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाल्याने वान नदीला पूर आल्याने बीड परळी रस्त्यावरील पांगरी गावाजवळ करण्यात आलेला पर्यायी पुलाखालील नळ्या वाहून गेल्याने बीड परळी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.वाहून गेलाला पुल पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली असून वाहतूक सुरळीत होण्यास विलंब लागत असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दोन्ही बाजूच्या प्रवाश्याना व वाहन धारकाना ताटकळत बसावे लागत आहे.