ताज्या घडामोडी
स्टेटस ठेवून बेपत्ता झालेल्या शिक्षकाचा मृतदेह धबधब्याजवळ सापडला
सौतादा धबधब्याजवळ अढळला म्रतदेह.

आनंद वीर(प्रतिनिधी)जिल्हा परिषद सर्व शिक्षण अभियान अंतर्गत पाटोदा येथील पंचायत समिती समितीमध्ये समावेशित शिक्षक विभागाचे साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र गंडाळे यांनी”आई व पत्नीची साथ मिळत नाही”असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून बेपत्ता झाल्याने पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद कण्यात आली होती.दिनाक 22 ऑगस्ट गुरुवारी दुपारी या शिक्षकाची मोटरसायकल व चप्पल सौताडा धबधब्या जवळ असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी,मित्रांनी व नातेवाईकांनी सौतडा धबधब्या जवळील परिसरात शोध घेतला,परंतु हे शिक्षक सापडले नाही मात्र काल दिनाक 23 ऑगस्ट रोजी दुपारी धबधब्यापासून काही अंतरावर राजेंद्र गंडाळे यांचा म्रतदेह आढळून आला या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून मृतदेह शो विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.