ड्रोनच्या घिरट्याचा पोलीस प्रशासनाने तात्काळ शोध घ्यावा.आ.पंकजाताई मुंडे
ड्रोन व चोरांच्या भीतीने नागरिक भयभीत.

आनंद विर(प्रतीनिधी) गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात चोरीच्या प्रमाणत वाढ झाली असल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी ग्रस्त वाढवत,नागरिकांनी आपल्या भागात रात्रीचे जागरण सुरू केले. त्यामुळे काही प्रमाणात चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत.मागील काही दिवसांपासून रात्री आकाशात ड्रोन दिसत असल्याने नागरिकांना संशय आहे की हे ड्रोन चोर ऑपरेट करत आहेत.बीड जिल्ह्यातील गेवराई ,आष्टी, धारूर , वडवणी सह इतर तालुक्यातील गावांमध्ये रात्री आकाशात ड्रोन दिसत असल्याने नागरिका मध्ये ड्रोन विषयी दहशत निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने तात्काळ या ड्रोन व ऑपरेट करणाऱ्याचा शोध लावून, संबंधितावर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यायला व नागरिकांमध्ये ड्रोनची असलेली भीती दूर करावी.अशी मागणी राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सह बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे मागणी केली आहे.