सुरेश कुटेची कारागृहातच ईडीच्या अधिकाऱ्या कडून चौकशी
ठेवीदारांचे पैसे हाँगकाँग ला कसे पळवले ?

आनंद वीर(प्रतिनीधी)बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजत असलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणातील ज्ञानराधाचे चेअरमन अध्यक्ष सुरेश कुटे यांनच्या 50 शाखा असून 3700 कोटी च्या वर ठेवी आहेत. ठेवीदाराचे पैसे वेळेवर न मिळाल्याने ठेवीदारांची फसवणूक केल्याने सुरेश कुटे,अर्चना कुटे सह संचालक मंडळावर बीड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रामधील इतर पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते.त्यामुळे सुरेश कुटे व आशिष पटोदकर हे सध्या बीड जिल्हा कारागृहात असून ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटेची ईडी च्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस कारागृहात चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.मागील आठवड्यात ईडी च्या अधिकाऱ्याने ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विविध शाखावर व कार्यालयावर छापे टाकून कागदपत्र तसेच महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले होते. व सुरेश कुटेच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात आली होती.सुरेश कुटे यांनी ठेवेदारांचे पैसे हॉंगकॉंग ला नेल्याची माहिती ईडीच्या कारवाई मध्ये समोर आली.हा पैसा हाँगकाँग ला कसा पळवला याची विचारणा,चौकशी सुरेश कुटेला करण्यात आली.दरम्यान परदेशातून 10 कोटीची गुंतवणूक आल्यावर ठेवीदारांचे पैसे देणार असल्याचा दावा कुटे करत असेल तरी आज मात्र ठेवीदारांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत असून मागील आठवड्यात वडवणी येथील सोनटक्के यांना बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नसल्याने मृत्यू झाला.एखाद्याच्या घरी लग्नकार्य, दवाखाना,शिक्षण तसेच इतर व्यवहार करण्यास अडचणी होत आहेत.