चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत चोरांनी केला चाकू हल्ला
चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या-माऱ्याच्या प्रमाणात वाढ

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून तर चोराची दहशत झाली असून नागरिक रात्र रात्र जागून काढत आहेत.चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर चोरांनी अक्षरशःधुमाकूळ घातला असून चकलांब्यासह वाडी,वस्त्या, तंड्यावरील नागरिक भयभीत झाले आहेत. गेवराई तालुक्यात रात्री आकाशात ड्रोन दिसत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे.गेल्या आठवड्यातच पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पत्रकाराचे दिवसाढवळ्या घर फोडल्याने पोलिसाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहेत.पोलिसांचा चोरावर वचक राहिला नसल्याचे दिसत आहे.काही दिवसापूर्वी पत्रकाराला पोलीस चकला मे पोलीस ठाणे समोरच एका पोलीस उपनिरीक्षका कडून बेदम मारहाण करण्यात आली होती.या मारहानिची तक्रार बीड पोलीस अधीक्षक यांनच्याकडे काण्यात आली होती. त्यामुळे हे पोलीस चोर सोडून संन्याशाला फाशी देत असल्याचे दिसत आहे.दिनांक 24 ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री 10 वाजता शहरातील बलानाईक तांडा परिसरात गाडी वस्तीवर चोरांनी एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याची घटना घडली.त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरीच्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे.