बस वाहक महिला कर्मचाऱ्याची प्रवाश्याना बेशिस्त वागणूक
प्रवाशांनी प्रश्न विचारले असता वीस मिनिटे बस थांबवून ठेवली

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड परळी प्रवास करत असताना प्रवाशा सोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार आहे, बीड परळी रस्त्यावरील पांगरी गावाजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. परळी बीड थेट तिकीट मिळत नसून परळी बीड येण्यासाठी प्रवाशी वाहतुक परळी सोनपेठ सिरसाळा बीड अशी वळविण्यात आली असून प्रवाशांन ज्यादा तिकिटाचा भुर्दंड बसत आहे.परळी बीड बस चे चालक,वाहक यांनी प्रवाशांनी काही प्रश्न विचारले असता वाहक आणि वीस मिनिटे बस थांबून ठेवत प्रवाशांना वेठस धरले.परळी डेपोची बस क्रमांक MH 20 BL 1882 या बस मधील वाहकानी प्रवाशाची व पत्रकाराची उद्धटपणाची वागणूक देऊन, व्हिडिओ काढण्यापासून रोखण्याने विशिष्ट वर्तन केले व फोटो व्हिडिओ काढत असताना मोबाईल हिसकावून घेतला असल्याने त्या वाहकाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.