मांजरसूब्याजवळ महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यास ट्रकने उडवले
जखमी पोलीस कर्मचारी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल

आनंद वीर(प्रतिनीधी)धुळे सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा रस्त्यावर महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यास ट्रकने जोराची धडक दिल्याने जखमी पोलीस कर्मचाऱ्यास बीड येथील खाजगी रुग्णांना उच्चारासाठी दाखल करण्यात आले.दिनाक 26 ऑगस्ट रोजी सकाळी मांजरसुंबा येथे महामार्ग पोलीस वाहनाची तपासणी करत असताना RJ O9 G C 4609 या मालवाहू ट्रकला चालकास ट्रक थांबण्याचा सांगितले असता त्यांनी वाहन अधिक वेगाने चालवत, पोलिसाच्या अंगावर ट्रक घातला त्यात महामार्ग पोलीस कर्मचारी चालक गजानन पराड यांना जोराची धकड दिल्याने रस्त्यावर पडले, दोन्ही टायरच्या मध्ये पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही,मात्र पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बीड मधील लोटस या खाजगी रुग्णांनालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.पोलिसांनी त्या ट्रक चालकास ताब्यात घेतले असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत.