
आनंद वीर(प्रतिनिधी) वन्य प्राण्याची शिकार करण्यास बंदी असताना केज तालुक्यातील वरपगाव येथील पारधी वस्तीवर राहणारे बन्सी पवार यांच्या पत्र्याच्या शेड मध्ये वन्यजीव काळवीट मारून त्याच्या मटणाचे वाटे करणार असल्याची माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली असता पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी पोलीस निरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे यांना छापा मारण्यास सांगितले.सादर वरपगाव हे बीड व धाराशिवचे बॉर्डर असल्याने बीड स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन संयुक्त कारवाई करत पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता पत्र्याच्या शेड मध्ये चार लोक काळवीट च्या मटणाचा वाटा करताना रंगेहाथ पकडले.त्याची नावे 1) भैया बन्सी पवार 2) सुनील ज्ञानोबा पवार 3)लाला शहाजी शिंदे व एक अल्पवयीन सर्व रा.वरपगाव ता. केज जि.बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील काळवीटाचे शिंगे असलेले मुंडके, इतर दोन शिंगे व काळविटा चे 20 किलो मांस,मांस कापण्यासाठी साहित्य जप्त करून आरोपी विरोधात केज पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला.ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, स्थानिक गणेश शाखा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर, पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप,पो. ह. तुषार गायकवाड, राहुल शिंदे,विकास राठोड, राजू पठाण तसेच धाराशिव गुन्हे शाखा स.पो.नी. सचिन खटके,अमोल मोरे, प्रदीप वाघमारे यांनी संयुक्तरित्या कारवाई केली.