संतापजनक शिक्षक विद्यार्थ्यांना टॉयलेट,बाथरूम साफ करायला लावतात,व्हिडिओ पहा
बीड तालुक्यातील मुळकवाडी केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

आनंद वीर(प्रतिनीधी) बीड तालुक्यातील मुळुकवाडी केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीच्या दिवशीच बाळ गोपाळांना टॉयलेट व बाथरूम साफ करायला लावण्याचा व्हिडिओ समोर येत असून, यामुळे पालक वर्ग संताप व्यक्त करत आहेत.या शाळेतील शिक्षक बऱ्याच दिवसापासून टॉयलेट,बाथरूम साफ करून घेतात अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्याला मिळाली होती.त्यामुळे याची खात्री करण्यासाठी शाळेत जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता घ्रणास्पद,लाजिरवाणा प्रकार पहावयास मिळाला असल्याने या शाळेतील शिक्षकावर पालक संताप व्यक्त करत आहेत.विद्यार्थ्याकडून अशी कामे करून घेत असल्याने रोगराई पसरण्याची,विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक सह सर्व शिक्षकावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी गावातील नागरिक व पालक करत आहेत.