किरीट सोमय्या म्हणाले,ज्ञानराधाच्या ठेवीदारांना दमडीही मिळणार नाही ?
सुरेश कुटेला भाजपमध्ये प्रवेश का दिला ?

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये ठेवीदाराचे 3700 कोटी च्यावर पैसे अडकले असल्याने गोरगरीब ठेवीदार अडचणी सापडले आहेत.गेल्या वर्षी ईडी ने कारवाई केल्याने ज्ञानराधा मल्टीस्टेट च्य सर्व शाखा बंद आहेत. सुरेश कुटे अर्चना कुटे सहसंचालक मंडळावर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्याने सुरेश कुटे,आशिष पाटोदकर हे बीड जिल्हा कारागृहात असून ईडी च्या अधिकाऱ्याने न्यायालयाचे परवानगी घऊन तीन दिवस कुटे यांची चौकशी केली असता ठेवीदाराचा मल्टीस्टेट मधील सर्व पैसा हॉंगकॉंग ला वळवल्याची माहिती समोर आली असल्याने तो पैसा हाँगकाँगला कसा पळवला याची माहिती पोलीस व ईडी चे अधिकारी घेत आहेत.औरंगाबाद येथील कुलकर्णी यांनी राजकारणातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे म्हणून किरीट सोमय्या यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांना फोन करून ज्ञानराधा मल्टीस्टेट विषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की ज्ञानराधा च्या ठेवीदारांना दमडीही मिळणार नसल्याचे सांगितल्याने ठेविधानाचा जीव टांगणीला लागला आहे.त्यावर कुलकर्णी यांनी प्रश्न केला की तुम्ही सुरेश कुटे ला भाजप मध्ये प्रवेश केला का दिला?यावरून असे दिसते की भाजप पक्षश्रेष्ठीच सुरेश कुटे ला अभय देत असल्याने पुढील कारवाई तपास होत नसून अर्चना कुटे सह संचालक मंडळ यांना अटक करत नसल्याचे ठेवीदार उघडपणे बोलू लागले आहेत. किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्यामुळे मात्र ठेवेदारात संभ्रम निर्माण झाला खरच ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील दमडीही मिळणार नाही का असा प्रश्न पडू लागला आहे.