गेवराई तालुक्यात वाळू उपशावर छापा टाकत 30 लाखाचा मुद्देमाल जप्त.
बीड स्थानिक गुन्हे शाखेचा वाळू माफियांना दणका

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अविनाश बारगळ यांनी घेतल्यावर पोलीस ठाणे प्रमुखांना आपल्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्या अनुषंगाने बीड स्थानिक गुन्हे शाखा विभाग व पोलीस ठाणे प्रमुखांनी विशेष मोहीम राबवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आल्या.गेवराई तालुक्यात विनापरवाना वाळू उपसा व वाहतूक करत असल्याची माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली असता गेवराई तालुक्यातील गोदापात्रात राक्षसभूवन परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत वाळू उपसा करण्यासाठी वापरत असलेल्या दहा केण्यासह ट्रॅक्टर ताब्यात घेउन जवळपास 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई दिनाक 28 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आली.जप्त केलेल्या वाहनाची कागदपत्रे नसल्याची माहिती समोर येत असून ताब्यात घेतलेली वहाने चकलांबा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली असून पुढील कारवाई सुरू आहे.ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे,सा.पो.उपनिरीक्षक जायभाये,पो.हे.महेश जोगदंड,विकास वाघमारे,दत्ता घोडके,बाळू सानप यांनी केली.