अखेर कुंडलिक खांडे यांना जामीन मंजूर…पण
सुनावणी सुरू होईपर्यंत स्वतच्या गावात जाण्यास बंदी.

आनंद वीर(प्रतिनिधी) शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांनच्यावर प्राणघातक हल्ला केला प्रकरणी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याच्यासह इतर लोकांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याप्रकरणी दोन महिन्यापासून कुंडलिक खांडे हे बीड जिल्हा कारागृह होते.बीड न्यायालयाने जामीन फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्या.शिवकुमार डीगे यांनच्यासमोर ही सुनावणी 22 ऑगस्ट रोजी युक्तिवाद पूर्ण झाला होता.न्यायालयाने हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले होते. कुंडलिक खांडे यांनच्या जमीनकडे अवघ्या बीड जिल्ह्याचे लक्ष लागून होते.यावर न्यायालयाने आज दिनाक 28 ऑगस्ट रोजी निकाल देत कुंडलीक खांडे यांचा जामीन मंजूर केला.परंतु न्यायालयाने कुंडलिक खांडे यांचा मंजूर झाला असला तरी या प्रकरणाची सुनावणी सुरू होईपर्यंत त्यांना स्वतच्या गावात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.