
आनंद वीर(प्रतिनीधी) केज विधानसभा भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वडमाऊली दहिफळ येथे अभिवादन कार्यक्रमास गेल्या असता मध्यधंद असलेल्या विजय गदळे याने गाडीवर दगडफेक केल्याने संगीता ठोंबरे सह गाडीचा चालक जखमी झाला.अभिवादन कार्यक्रम पार पडल्यावर ऋषी गदळे या कार्यकर्त्याच्या घरी चहा पानासाठी जात असताना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विजय उत्तम गदळे या मध्यधुंद अवस्थेमध्ये शिवीगाळ करत गाडीच्या चालकाच्या बाजूने दगडफेक केली.त्यात गाडीचे चालकाच्या बाजूचा काच फुटून दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागून तोच दगड गाडीत बाजूला बसलेल्या संगीता ठोंबरे यांच्या चेहऱ्यावर लागल्याने त्यादेखील जखमी झाल्या.त्यांना उपचारासाठी केज रुग्णालयात दाखल केले असून त्यांचा सिटीस्कॅन केल्यानंतर समजेल की जखम किती खोलवर आहे.असे डॉक्टरांनी सांगितले रुग्णालयाचा अहवाल आल्यावर संगीता ठोंबरे यांचा जवाब नोंदवणार असल्याची माहिती पोलिसाकडून मिळत आहे. संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या मध्यधंद विजय गदळे याला गावकऱ्यांनी चांगला चोप दिला.