
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड तालुक्यातील लिबागणेश ग्रामपंचायत मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामसभा झाली नसल्याने आज दिनाक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30वाजता ग्रामसभा घेण्याची वेळ ठरवण्यात आली होती,परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी 12:30 वाजता ग्रामसभा सुरू केली असता ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील विविध समस्येचे समस्या बाबद निवारण कधी करणार असा सवाल करण्यात आला.लिंबागणेश गावामध्ये नाल्यान नसल्याने रोगराई पसरत आहे,वाणी वस्ती कडे जाण्यासाठी रस्ता चिखलमाय झाला असून गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून देण्याची मागणी केली होती, गावांमधील विद्युत खांबावरील दिवे बंद असल्याने ते सुरू करण्यात यावे, अनेक दिवसापासून धूर फवारणीसाठी आणलेली मशीन ही धुळखात पडून आहे मशीनचा वापर केला नाही, गावांमधील लाईट सतत जात असल्याने त्यावर उपाय योजना कराव्यात या सह गावातील विविध समस्या विषयी सरपंच ग्राम विकास अधिकारी यांना केली असता त्यांनी ग्रामपंचायत असता ग्रामपंचायत सदस्यांना उत्तर न देता ग्रामपंचायत बाहेर जाण्यास सांगितल्याने एकच गोंधळ उडाला,त्यामुळे ग्रामसभा झाली नाही.ग्रामविकास अधिकारी व सरपंच याची तक्रार वरिष्ठाकडे करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.