“ज्ञानराधाच्या”यशवंत कुलकर्णीला पोलिसांनी पुण्यातून केली अटक
यशवंत कुलकर्णी अनेक महिन्यापासून फरार

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेवर ठेविदाराची फसवून केल्याने चेअरमन अध्यक्ष सुरेश कुटे, अर्चना कुटे,उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी सहसंचालक मंडळावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याने सुरेश कुटे दोन महिन्यापासून बीड जिल्हा कारागृहात असून आहेत या गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेला ‘ज्ञानराधा’चा मुख्य सूत्रधार,उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी आणि त्याचा मुलगा वैभव अखेर पोलीसांच्या ताब्यात आले आहेत. या दोघांना पुणे पोलीसांनी ताब्यात घेतले असून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यशवंत कुलकर्णी ला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.अनेक गुन्ह्यातील आरोपी ‘ज्ञानराधा’मल्टीस्टेटचा उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी आणि त्याचा मुलगा वैभव कुलकर्णी अनेक महिन्यापासून पोलीसांना सापडत नव्हते. दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवारी या दोघे पुण्यात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार पुणे पोलीसांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बीडच्या गुन्हे शाखेचे अधिकारी व पथक या दोघांना ताब्यात घेण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहे. मुख्य सूत्रधार यशवंत कुलकर्णी वर राज्यात फसवणुकीचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याने तो फरार होता.