ताज्या घडामोडी
बीड स्थानिक गुन्हे शाखेची बनावट ग्रीस कारखान्यावर छापा
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी,8,82,085 रुपयाचा मुद्देमाल जप्त

- आनंद वीर(प्रतनिधी) बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदाचा कारभार अविनाश बारगळ यांनी घेतल्यापासून अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात मोहीम राबवली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तर अवध धंदे करणाऱ्या वर कारवाई चा सपाटा लावला आहे. परळी शहरांतील बसवेश्वर कॉलनीमध्ये बनावट ग्रीस कारखाना असल्याची माहिती गणेश शाखा पथकाला मिळाले असता त्यांनी बनावट गिरीश कारखान्यावर छापेमारी करत सात लाख 82 हजाराचा मुद्देमाल,ग्रीस जप्त करण्यात आले. परळी शहरातील रियाज रहीम शेख वय 32 वर्षे याने बसवेश्वर कॉलनीमध्ये राहत्या घरी दुचाकी व चार चाकीसाठी लागणारे बनावट ग्रीस करत असल्याची माहिती बीड स्थानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली असता परळी पोलीस स्टेशनचे अधिकारी व पुरवठा विभागाची कर्मचारी यांनी मिळून बनवून गिरीश कारखान्यावर छापा मारला घरामध्ये ऑइल ग्रीस उत्पादनाने भरलेली बकेट, ग्रीस बनवण्यासाठी व पॅकिंग करण्यासाठी लागणारे साहित्य, वेगवेगळ्या रंगाचे केमिकल व पावडर असा मुद्देमाल जप्त करून त्याची अंदाजी किंमत 7,82,085/जप्त करून परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख,पो.हे. विष्णु सानप,गणेश हांगे, परळी पोलीस ठाण्याचे स.पो.नी. शिंदे, स.पो.नी. गुट्टेवार,पो.हे. गीते, पुरवठा विभागाचे सुधाकर डोईफोडे यांनी ही करवाई केली.