धनंजय मुंडे चा”निरुपयोगी”कृषी महोत्सव… कालिदास आपेट
शेतकऱ्यांच्या समस्यावर कोणताही नेता,मंत्री बोलले नाही.

आनंद वीर(प्रतिनिधी)परळी येथे 21 ते 26 ऑगस्ट या कालावधीत अतिभव्य कृषी महोत्सव भरविला. शेती करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे सुमारे 450 स्टॉल कृषी महोत्सवात लावले होते. मात्र आत्महत्येच्या कड्यावर उभे असलेल्या शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंच्या कृषी महोत्सवाने काय दिले? हा प्रश्न यानिमित्ताने महत्त्वाचा आहे.परळी शहरात 21 ऑगस्ट रोजी देशाचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आमंत्रित केले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबरोबर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली होती. याविषयी कुणी काहीच बोलले नाही. एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका विद्यार्थी, लाडका दाजी अशा योजना राबविल्याचे सगळ्यांनी ठासून सांगितले, परंतु शेतकऱ्याांच्या समस्या,अडचणी विषय एकही नेता,मंत्री बोलले नसल्याने हे कृषी प्ररदर्शन निरुपयोगी ठरल्याचा आरोप करण्यात आला.नुकतेच सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांचे भू-संपादनाचे पैसे वर्षांनूवर्ष का देत नाही?अशी विचारणा केली. नवीन लाडकी बहीणसारख्या योजना रद्द कराव्या का? असा इशारा दिला. याकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांनी भाषणे उरकली.देशाचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जगभरातील कृषी संशोधन भारतातील शेतकऱ्यांना वापरावयास बंदी का घातलेलीआहे? याबद्दल खुलासा करणे गरजेचे होते.तसेच राज्याच्या कृषीमंत्र्यांनीही चारही कृषीविद्यापीठे मागील 25 वर्षापासून कसलेहीसंशोधन का करीत नाहीत? याविषयी बोलणेआवश्यक होते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येवरबोलण्याचे धाडस कुणीचं दाखविले नाही.शेतीमाल विक्रीची समस्याशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भूलथाप देऊन नरेंद्र मोदी सरकारने कांदा, कापूस, साखर, सोयाबीन, तांदूळ, गहू, हरभरा, दुधभूकटी आदी सर्व शेतीमालाला निर्यातबंदी केली असून बेसुमारपणे शेतीमालाच्या महागड्या आयातीला मोकळीक दिली आहे. जुलै 2024 अखेर सुमारे 20 लाख टन पामतेलाची आयात केली आहे. मागील वर्षी 165 कोटी टन पामतेल आयात केलेले आहे. त्यापैकी सुमारे 50 लाख टन पामतेल शिल्लक असतानाही आयातीचा सपाटा सुरू आहे. पीक कर्ज मिळत नाही. शेतमालाला भाव नाही. आत्महत्या वाढत चालल्या आहेत. यावर कुणी ब्र शब्द मेळव्यात काढला नाही. त्यामुळे कृषी महोत्सव निरुपयोगी ठरल्याचा आरोप शेतकरी संघटना कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केला आहे.
आपेट यांनी केला आहे.