मुजोर शिक्षिकेला कंटाळून विद्यार्थिनींनी केली शाळेला कुलूप ठोकण्याची मागणी !
शिक्षिकाच मुलींना शिवीगाळ करतात,उर्दू कन्या शाळेतील धक्कादायक प्रकार

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील उर्द कन्या शाळेतील शिक्षिकेने मुलींना शिवीगाळ करणे आवार्च भाषेत वागणे व धमक्या देणे असे अनेक गंभीर वागणुक देत असल्याने विद्यार्थिनी पालकांनी सहिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार करत निवेदन दिले.बीड शहरातील शहंशाह वली दर्गा परिसर येथे इ. 9 वी व 10 वी चे उर्दू कन्या शाळेचे वर्ग सुरु आहे, सदर शाळेत दोन शिक्षक व एक शिक्षिका असून सर्व विद्यार्थीनी व विद्यार्थी गरीब, मजूरी व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणारे पालकांचे पाल्य आहेत. म्हणूनच की काय शाळेतील शिक्षिका फिरदोस बाजी नेहमी आमच्या मुलींना शिवीगाळ करणे, आर्वाच भाषेत धमक्या देणे, गरीब माता पालकांबद्दल अपशब्द वापरणे, वर्गात शिकविण्या ऐवजी कमी वयातील मुलींना नको त्या गोष्टी बद्दल बोलून तिरस्कार ची भाषा करणे, चाचणी परिक्षेचे पेपर फाडणे यासारखे प्रकार सुरुच आहेत. तसेच मागील दोन वर्षा पासून त्या शाळेत नियमित येत ही नाहीत, कधी ही येतात कधी ही जातात. शाळेत येऊन ही वर्गात न येता बाहेरच बसतात. मागील वर्षा पासून आम्ही त्यांना सहन करत आलो. पण त्यांच्या अशा बेजबाबदार पणे वागण्याने आमच्या मुली दहशतीखाली शिक्षण घेत असल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. मेहरबान साहेबांना विनंती त्यामूळे ,अशा कामचुकार, बेशिस्तपणे वागणाऱ्या फिरदोस बाजी यांची चौकशी करुन त्यांची इतर ठिकाणी बदली करुन कारवाई करावी व आमच्या मुलींचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अन्यथा आम्ही शाळेस कुलूप ठोकून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु, असे निवेदनात म्हटले आहे.मा. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, यांना शिक्षक व पालकाच्या वतीने निवेदन देण्यात आले.