ताज्या घडामोडी

“गेवराई विधानसभा”या नावाची लिंक ओपन करताच बँक खात्यातील रक्कम गायब !

ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढ.

आनंद वीर(प्रतिनीधी)बीड जिल्ह्यात सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत असून बीड  व्हाट्सअप ग्रुप वर लिंक पाठवून ती लिंक ओपन करताच बँक खात्यातील रक्कम गायब होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.

गेवराई तालुक्यांतील चकलांबा आणि परिसरात एक महिन्यापासून चोरामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत.त्यातच या दोन दिवसांपासून व्हाट्सअप वर “गेवराई विधानसभा”या नावाने लिंक आली होती.ही लिंक उघडताच लोकांचे मोबाईल हॅक होऊ लागले,तर कोणाचे बँक खाते साफ होऊ लागले.चकलंबा येथील शाकेर गणी पठाण या मुलाला ही लिंक आली असता त्याने ही लिंक उघडताच दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी त्याच्या बँक खात्यातील ४९९९ रु. नंतर १९९९ रु. परत नंतर ९८५ रु. असे एकूण मिळून ७९८३ रु . बँक खात्यातून कपात होऊन फसवणूक झाली. पाच मिनिटांनतर बँकेचा कपात झालेल्या मॅसेज आल्यानंतर शाकेर पठाण च्या लक्ष्यात आले की आपली या लिंक द्वारे फसवणुक झालेली आहे. सदरील लिंकची, मोबाईल नंबरची तक्रार सायबर शाखेला करणार असल्याचे पठाण यांनी सांगितले तरी नागरिकांनी अश्या आलेल्या फ्रॉड ऑनलाईन लिंक पासुन सावध रहावे. व कोणतीही लिंक आली ,त्याला क्लिक करून ओपन करू नये नाहीतर बँकेेेेेतील रक्ककम साफ होईल.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button