
आनंद वीर (प्रतिनीधी) : केज तालुक्यातील शेतात महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्यााने खून केल्याची घटना शनिवार रोजी घडली. खून करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेने जिल्हा हादरला आहे.या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील नागझरी येथील सुवर्णा आणि विलास आघाव हे पती-पत्नी सारणी (आ) येथे सालगडी म्हणून एका शेतात काम करीत होते. दि. 31 ऑगस्ट रोजी ((सा) ता.केज) येथील शेतात शनिवारी दुपारी विलास नामदेव आघाव ( नागझरी ता.धारूर) या सालगड्याने त्याची पत्नीचे एका पुरूषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात काठी मारून जागीच खून केला. खून केल्यानंतर आरोपी विलास आघाव हा पळून जात असताना पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे घटनास्थळी पोहोचून कार्यवाही केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते.मृतदेह शविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात आणण्यात आला होता. मयत सौ.सुवर्णा आघाव हिला तीन अपत्ये आहेत. दरम्यान खूनाच्या या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे.