नौकरी मिळवण्यासाठी युवक युवतींनी उपस्थित रहावे. अनिल(दादा)जगताप
सुशिक्षित तरुण-तरुणासाठी भव्य मेळावा...

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड जिल्हा मागासला जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे, बीडमध्ये मोठे उद्योगधंदे नसल्याने, व्यवसायाला चालना भेटणार असे औद्योगिक व्यवसाय नसल्याने मधील तरुण वर्ग नौकरीसाठी कायम भटकंती करताना दिसून येतो.मात्र अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धापात्रता असताना देखील नौकरीची संधी प्राप्त होत नाही.ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी बीड मधील युवक-युवतींसाठी भव्य नौकरी भरती मेळाव्याचे आयोजन केले असून हा मेळावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून मेळाव्याय उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकास शंभर टक्के नौकरीची संधी मिळणार आहे. याबरोबरच जागेवरनि युक्तीपत्र देखील देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे नौकरी मिळवण्यासाठी कोणत्याच उमेदवारवारास फी किंवा पैशांचीआवश्यकता भासणार नाही. बीडमधीलतरुण वर्गाने जास्तीत जास्त संख्येने नोकरी भरती मेळाव्यात प्राधान्याने उपस्थित राहून नौकरीची संधी प्राप्तकरावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा.अनिलदादा जगताप यांनी केले आहे.हा नौकरी भरती मेळावा दिनांक1 सप्टेंबर रविवार रोजी बीड शहरातील एमआयडीसी भागातील मॉ. वैैष्णवी पॅलेस येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित केला असून बेरोजगार तरुण,तरुणींनी याचा लाभ घ्यवा असे आवाहन अनिल दादा जगताप यांनी केले आहे.