पेठ बीड पोलिसांनी 24 तासाच्या आत दुचाकीचोर पकडला.
गुन्हा दखल होताच,दुचकीचोर अटकेत,पेठ पोलिसांची कामगिरी.

आनंद वीर(प्रतिनीधी) बीड जिल्ह्यात सध्याच्या दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून,जिल्ह्यात दररोजच कुठे न कुठे दुचाकी चोरीच्या घटना होत असून,गुन्हे दाखल होत आहेत. मागील महिन्यामध्येच बीड गुन्हे शाखा पथकाने दुचाकी चोराच्या मुसक्या अवळत वीस दुचाकी जप्त केल्या होत्या.दिनाक 26 ऑगस्ट रोजी प्रभू रत्नराव मोरे रा.गुंधा वडगाव हे रात्री लघवी करण्यासाठी थांबले असता,MH 23BE 2774 हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची दुचाकी चोरांनी पळवली त्यामुळे दिनाक 31 ऑगस्ट रोजी सकाळी दुचाकी चोरीचां गुन्हा दाखल करण्यात आला.तात्काळ पेठ बीड पोलीसांनी घटनेचे स्थळ व आरोपीची माहिती काढून सचिन विश्वनाथ पाटोळे रा.रमाई नगर बीड या दुचाकीचोरास ताब्यात घेतले असून पुढील तपास पो.हे.सोनवणे करत आहेत.24 तासाच्या आत चोरास ताब्यात घेऊन पेठ बीड पोलिसांनी दमदार कारवाई केली, ही कारवाई बीड बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज, पोलीस उपनिरीक्षक शेख रियाज,पो.हे.शेख नसीर,पो.हे. विठ्ठल देशमुख, सुभाष मोटे, बास्टेवाड,चालक शेख असद यांनी केली.