लिंबागणेश येथील स्मशानभूमीचे काम रखडल्याने अंत्यसंस्कार पावसात करण्याची वेळ!
आमदार साहेब नरक यातना कधी संपणार ? डॉ.गणेश ढवळे

बीड/प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषदसर्कलचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंबागणेश येथील स्मशानभूमीचे काम आ. संदिप क्षीरसागरयांच्या कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेरखडलेले असुन पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तिव्र नाराजी असुन ” सरण रचुन ठिय्या” आंदोलन केल्यानंतर आ. संदिप क्षीरसागर यांनी दिड वर्षांपूर्वी स्मशानभूमीसाठी मंजुर केलेल्या 8 लक्ष रुपयांच्या निधीतून अद्याप काम पूर्ण का नाही?? त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर साहेब नरकयातना संपणार कधी?? आणि लिंबागणेश येथीलस्मशानभूमीचे काम पूर्ण होणार कधी?? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी विचारला आहे. लिंबागणेश येथील 20 वर्षांपूर्वीबांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था असुन पत्रे उडुन गेलेले,बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत असल्याने नविन स्मशानभूमी बांधकामासाठी निधी देण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनीस्मशानभूमीत सरण रचुन ठिय्या आंदोलन केले होते. याची दखल आ. संदिपक्षीरसागर यांनी घेत जिल्हा वार्षिक (दहन/दहनभुमी) जन सुविधा विशेषअनुदान योजनेंतर्गत मुलभूत सुविधांसाठी सन 2022-23 आर्थिक वर्षाकरीता ग्रामपंचायत लिंबागणेश येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरणासाठी 8लक्ष रुपयांचा निधी मंजूर करत दि. 31 मार्च 2023 रोजी प्रशासकीय मान्यतादिली होती. मात्र आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे स्मशानभूमीचे काम रखडलेले असुन काल सायंकाळी अल्पशा आजाराने मयतझालेल्या कै. केशरबाईतुळशीरामनाईकवाडे यांचा अंत्यविधी आज दि.1सप्टेंबर रोजी सकाळी भर पावसात करावा लागला.त्यामुळे गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करत या गावातील समशान भूमी बाबतीतील नरक यातना कधी संपणार? असा सवाल केला.
स्मशानभमीचे काम आ.संदिप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे दिडवर्षापासुन रखडल्याने पावसात अंत्यविधी करण्याची नामुष्की :- . डॉ.गणेश ढवळे