बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो पुर येण्याची शक्यता !
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे नगरपालिकेने केले आवाहन

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरासह जिल्हाभरात दोन दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे.दिनाक ३१ ऑगस्ट रोजी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी,ओढे,नाले वाहू लागले आहेत. बीड शहरापासून जवळ असलेल्या बिंदुसरा प्रकल्प जवळील,वरील छोटे तलाव,नद्या संततधार पाऊस झाल्याने ओसंडून वाहत आहेत.त्यामुळे बिंदुसरा प्रकल्प ८०%भरला असून छोट्या चादरीवरून पाणी जात आहे.१जून ते १ सप्टेंबर २०२४ पर्यंत ५६३.६ मी.मी.पावसाची नोंद आहे. गेल्या वर्षीचे तुलनेने यावर्षी दुप्पट पाऊस पडत असल्याने आज सकाळपासून मध्यम पाऊस पडत आहे पाऊसाचा असाच जोर कायम राहिला तर बिंदुसार धरणाला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिंदुसार नदीकाठी रहणाऱ्या नागरिकांना नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर नियंत्रण रेषेत राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असे आवाहन बीड नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे व बीड तहसीलदार याने केले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी नगरपालिकेने हायटेक गाडीवरून माईक द्वारे करण्यात येत आहे.