बिंदुसरा धरणावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी
हुल्लडबाज तरुणांसह पर्यटकही जीव धोक्यात खालून पाण्यात उतरू लागले

वीर(प्रतिनिधी) गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओढे, छोटे-मोठे तलाव ओव्हरफ्लो झाले असून बीड शहराजवळील बिंदुसरा धरण भरले आहे. छोट्या चादरी वरून पाणी जात असल्याने चे पाहण्यासाठी बीड मधील व आसपास च्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पाली येथील बिंदुसरा धरणावर येत आहेत. त्यातच काही हुल्लडबाज तरुण जीव धोक्यात घालून पाण्यात उड्या मारत आहेत,उतरत आहेत, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अचानक पाण्यात वाढ झाली तर एखादा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही पर्यटक देखील पाण्यात उतरून जीव धोक्यात घालून फोटोसेशन सेल्फी काढत आहेतया आधी देखील या धरणावर बऱ्याच वेळा अशा दुर्घटना झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा हुल्लडबाज तरुणांना चोप द्यावा. व पाण्यामध्ये जाण्यापासून रोखावे त्यामुळे एखादा होणारा अनर्थ टळेल.