
आनंद वीर(प्रतिनीधी)बीड जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओढे, नदी,तलाव ओसंडून वाहत आहेत.३१ऑगस्ट रोजी रात्री सुरुवात झालेला मध्यम पाऊस दिवसभर पडल्याने रविवारी बीड शहराजवळ बिंदुसरा तलाव १००%भरला असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. अंकुश नगर भागातील करपरा नदी देखील ओसंडून वाहत आहे, आज दिनाक 2 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या भागतील नागरिक करपरा नदी कडे पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यात एक पुरुष जातीचा मृतदेह वाहून आलेला दिसल्याने तत्काळ नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना याच माहिती दिली.असता तत्काळ पोलिसांनी अंकुश नगर भागातील नदीमध्ये घटनास्थळी दाखल होऊन आज दिवस पाण्याबाहेर काढला व मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.