अनिलदादा जगताप यांनी बीडच्या हजारो तरुणांना नौकरी दिली !
बीड मधील 1327 युवक युवतींना नौकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले

बीडच्या हजारो तरुणांना नौकरी देण्यासाठी अनिलदादा जगताप यांनी सुपरहायवे तयार केला- अर्जुनराव खोतकर*
आनंद वीर(प्रतिनिधी)- राज्याच्या आणि देशाच्या समोर सध्या रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिलेला असताना अनिलदादा जगताप यांनी नौकरी भरती मेळाव्याचे आयोजन करून अत्यंत महत्वपूर्ण विषयाला हात घातला आहे किंबहुना बीडच्या हजारो तरुणांना नौकरी देण्यासाठी अनिलदादांनी सुपरहायवे तयार केला आहे असं मला याठिकाणी कौतुकाने नमूद करावसं वाटतं. अनिलदादा तुम्ही लोकांचा आधार बनतायत, युवा वर्गास नौकरीची संधी देऊन प्रत्येक कुटुंबात आनंद पेरतायत याच्यापेक्षा मोठं समाधान कुठलं असू शकत नाही. अनिलदादांनी आताच आपल्या भाषणात माझ्याकडे मागणी की, तुम्ही मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेचा बीडला एक महामेळावा द्या, ज्यामुळे माझ्या बीडच्या पन्नास हजार तरुणांना नौकरी मिळेल. दादा मी आपणास शब्द देतो की, मी लवकरच आपली मागणी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना बोलेल आणि त्यांना बीडमध्ये युवा कौशल्य विकास योजनेचा महामेळावा आयोजित करण्यासाठी सांगेल ज्यातून बीडमधील तरुणांना चांगल्या पगारच्या नौकऱ्या मिळतील असे माजीमंत्री तथा शिवसेना मराठवाडा संपर्क नेते मा. अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांना अभिवचन दिले.काल दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता माँ वैष्ण पॅलेस बीड येथे जिल्ह्यातील सुशिक्षित आणि दुर्दैवाने बेरोजगार असलेल्या युवक युवतींसाठी नौकरीची सुवर्णसंधी प्राप्त करून देण्याच्या उदात्त हेतूने बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य नौकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून माजी मंत्री शिवसेना मराठवाडा संपर्क नेते मा. अर्जुनरावजी खोतकर साहेब होते तर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बापुसाहेब मोरे साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख जालना पंडित भुतेकर, जालना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, आमचे मित्र महाराष्ट्र राज्य व्यापारी महासंघाचे महामंत्री संतोषसेठ सोहनी, डीएचओ गंडाळ साहेब, बीडीओ सानप साहेब, तालुका आरोग्य अधिकारी कासट साहेब, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या ऍडव्ह संगीता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्या तसेच लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत नौकरी मेळाव्याचे उदघाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. प्रतिक कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत नौकरी भरती मेळाव्याची माहिती दिली. भर पावसात हजारोंच्या संख्येने सकाळी 10.00 वाजल्यापासून ते सायं 6.00 वाजेपर्यंत सुरु असलेल्या नौकरी भरती मेळाव्यात हजेरी लावलेल्या बीडमधील तब्बल 1327 युवक-युवतींना जागीच मान्यवरांच्या शुभहस्ते नौकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये 14 हजार रुपयांपासून ते 32500 रुपयांपर्यंत पगाराची नौकरी युवक-युवतींना मिळाली. कार्यक्रमाचे उदघाटक मान्यवर मा. अर्जुनराव खोतकर साहेब आणि बापुसाहेब मोरे साहेब यांनी युवा वर्गास सक्षम करण्याकरिता बीड शिवसेनेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. याबरोबरच उपस्थित असलेल्या युवक-युवतींना मार्गदर्शन करत नौकरी भरती मेळाव्यातून स्वतःचा उत्कर्ष साधा, कुटुंबाची जबाबदारी उचलून आयुष्याची वाटचाल समृद्ध करा असे सांगत शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीस प्रेरित होऊन नौकरी याठिकाणी भरती मेळाव्याचे आयोजन केले. ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसण्याचे काम आम्ही सुरु केलंय. युवक-युवती कामासाठी इतर जिल्ह्यात भटकंती करावी लागते तेंव्हा त्यांना प्रचंड अडचणी येतात. बीडच्या मुलांना शेती करता येत नाही, नौकरी करता येत नाही. परिस्थितीचं दुखणं सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. युवा वर्गाची ही अडचण लक्षात घेऊन त्यांच्या सक्षमीकरनाचा संकल्प हाती घेतला आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या सहकार्यातून युवा वर्गास आर्थिक बाजूने आम्ही सक्षम करणार आहोत असे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले.*
मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेच्या महामेळाव्यातून* *बीडमधीलपन्नासहजारतरुणांनानौकरीमिळणार*काल रोजी पार पडलेल्या नौकरी भरती मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी कार्यक्रमाचे उदघाटक माजीमंत्री तथा शिवसेना मराठवाडा संपर्क नेते मा. अर्जुनराव खोतकर यांच्याकडे बीडमधील युवा वर्गाच्या व्यथा मांडत मागणी केली की, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेचा बीडला एक महामेळावा द्या, ज्यामुळे माझ्या बीडच्या पन्नास हजार तरुणांना नौकरी मिळेल. याप्रसंगी अनिलदादांच्या यां निःस्वार्थ मागणीचा विचार करत अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, दादा मी शब्द देतो मी लवकरच मुख्यमंत्री शिंदे साहेबांना यासंदर्भात बोलेल आणि त्यांना बीडमध्ये कौशल्य विकास योजनेचा महामेळावा आयोजित करण्यासाठी सांगेल ज्यातून चांगल्या पगारच्या नौकऱ्या मिळतील. यावरून निश्चितच येणाऱ्या काळात अनिलदादा जगताप यांच्या यां मागणीतून बीडमध्ये मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेच्या महामेळावा साकार झाल्यास बीडमधील पन्नास हजार तरुणांना नौकरी मिळतील असा अंदाज आहे.